Thursday 28 April 2016

आपल्या जीवनाला उत्सवी स्वरूप द्या - योग, ध्यान आणि ज्ञान

आर्ट ऑफ लिव्हिंग ची व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, आधुनिक आणि अध्यात्मिक शक्तीचा संगम असून त्याने आयुष्यात सुख आनंद आणि आत्मबळ वाढते.
योगा : योगा म्हणजे काय?
योगा एक जीवनशैली !
योगा हा शब्द 'युज' ह्या संस्कृत शब्दावरून घेतलेला आहे. आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे म्हणजेच योग. योगा किंवा योगाभ्यास ही ५,००० वर्ष जुनी ज्ञानशाखा आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे फक्त शारिरीक व्यायाम आहे, ज्यात एका विशिष्ट पध्द्तीने शरीर ताणले जाते आणि श्वासोश्वास घेतला जातो. खरे म्हणजे ही एका खूप मोठ्या मानवी मन व आत्म्याच्या अनंत विकासाविषयी असलेल्या शास्त्राची केवळ वरवरची ओळख झाली.
योगशात्र हे सगळ्या जीवनाचे सार असलेली एक जीवनशैली आहे. ज्ञानयोग किंवा तत्वज्ञान, भक्तीयोग किंवा भक्तीयुक्त शाश्वत सुखाचा मार्ग, कर्मयोग किंवा सुखप्रद कर्ममार्ग, आणि राजयोग किंवा मनावर ताबा मिळविण्याचा मार्ग. राजयोगाची देखील आठ अंगे आहॆत. राजयोगपध्दतीचे मर्म म्हणजे योगसने ज्यामुळे वरील नमूद केलेल्या विविध मार्गांमध्ये समतोल राक्ता येतो.

ध्यान
ध्यानधारणा म्हणजेच संपूर्ण विश्रांती
ध्यानात मिळणारी विश्रांती ही आपल्या गाढ झोपेतून मिळणार्या  विश्रांती पेक्षाही गहन असते. जेव्हा मन स्थिर, शांत आणि प्रसन्न असते तेव्हा ध्यान होते.
ध्यानाचे अनेक फायदे आहेत. मानसिक स्वास्थ जपण्यासाठी ध्यान हे अत्यावश्यक आहे. शांत मन, एकाग्रता, स्पष्ट आकलन, संवाद शैलीतील सुधारणा, कौशल्य व बुद्धिमत्ता ह्यांचा विकास, निरोगीपणा, अंतःस्त्रोतातील उर्जेला जोपासणे, दृढ आत्मबळ, संपूर्ण विश्रांती, उत्साह आणि सौभाग्य, हे सर्व नियमित ध्यान केल्याचे फळ आहे.
सध्याच्या जगात तणाव हा इतक्या वेगाने पसरतो आहे कि ध्यान करणे हि चैनीची गोष्ट नसून अत्यावश्यक गोष्ट आहे. निर्वेध सुख आणि संपूर्ण मन:शांती मिळविण्यासाठी आपण ध्यानधारणेवर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे.